सहा हजार जणांना रोजगार - पुष्पा सुब्रमण्यम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सातारा - बीव्हीजी ग्रुपच्या मेगा फूड पार्कमधील सर्व ३२ कंपन्या सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सहा हजारांपेक्षा जास्त जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबर शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे उत्पादकांनाही चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी (ओएसडी) पुष्पा सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. 

अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी गटाने नुकतीच देगाव (ता. सातारा) येथील बीव्हीजी ग्रुपच्या मेगा फूड पार्कमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करून तेथे सुरू असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. त्यावेळी पुष्पा सुब्रमण्यम बोलत होत्या. पाहणी गटात त्यांच्यासह महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे (एमएसीपी) जिल्हा उपसंचालक विजयकुमार राऊत, ‘आयएलएफएस’चे अधिकारी विजय भास्कर रेड्डी यांचा समावेश होता. फूड पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार छोले यांनी सर्वांचे स्वागत केले. 

अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या अधिकारी गटाने वर्षभरामध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठीच्या सूचनाही दिल्या. स्थानिक गरज आणि उत्पादित भाजीपाला व फळांवर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने सातारा मेगा फूड पार्कला सरकारने मान्यता दिली आहे. त्याचे काम वेगाने सुरू असून, शेतकरी, शेतकरी कंपनी आणि प्रक्रिया उद्योजकांनी येथे येऊन गुंतवणूक करायला हवी. 

आतापर्यंत या फूड पार्कमध्ये गुंतवणूक करून उत्पादन सुरू केलेले उद्योजक कौतुकास पात्र आहेत. कारण त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळण्यासाठी मोठी मदत होत आहे, असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले.

Web Title: 6000 people employment pushpa subrahmanyam