'देशाच्या प्रगतीसाठी जातिभेद विसरून एकत्र या'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कोल्हापूर - ""विविधतेत ऐक्‍य हीच देशाचे ओळख आहे. तरीही आपण आडनावावरून जात शोधतो. ही विसंगती दूर करून जाती, धर्म, पंथ विसरून देशाच्या प्रगतीसाठी एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर - ""विविधतेत ऐक्‍य हीच देशाचे ओळख आहे. तरीही आपण आडनावावरून जात शोधतो. ही विसंगती दूर करून जाती, धर्म, पंथ विसरून देशाच्या प्रगतीसाठी एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महापौर हसीना फरास, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे व हातकणंगले पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलिस पथक जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री पाटील यांनी पोलिस मुख्यालय, सशस्त्र पोलिस पथक, सशस्त्र पोलिस पथक महिला, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, प्रादेशिक परिवहन पथक, वनरक्षक, एन.सी.सी., आर.एस.पी. विद्यार्थी, नेव्ही एन.सी.सी., तारा कमांडो फोर्स, आर.एस.पी. पथक, वायू एन.सी.सी. पथक, कमांडिंग फोर्स, भारत गर्ल्स गाईड पथक, व्हाईट आर्मी, निरीक्षण गृह पथक, पोलिस बॅंड, श्‍वानपथक, कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग, सह्याद्री कॅडेट फोर्स, दंगल नियंत्रण तसेच शहर व जिल्ह्यातील विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली.

या वेळी विविध विभागांनी आकर्षक व लक्षवेधी चित्ररथ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. सिद्धगिरी गुरुकुल कणेरी मठाने लाठी-काठी प्रात्यक्षिके दाखविली तर महापालिकेच्या प्राथमिक शाळातील मुलांनी माझे कोल्हापूर हे सादर केलेले समूहनृत्य लक्षवेधी ठरले. पालकमंत्री पाटील यांनी स्वत: जाऊन या चिमुकल्यांचे कौतुक केले. उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य सादर केले तर सुमारे अडीच हजार विद्यार्थी, विद्यार्थिनींनी समूह गीते सादर केली.

Web Title: 68 th Republic Day at the Chhatrapati Shahu Stadium