सांगली जिल्ह्यात 689 कोरोनामुक्त; नवे 393 रुग्ण; मृत्यू 19

जयसिंग कुंभार
Sunday, 4 October 2020

सांगली जिल्ह्यात आज 689 जण कोरोनामुक्त झाले. नवे 393 रुग्ण आढळले. नव्या कोरोना रुग्णांचा घटता आलेख कायम असून, कोरोनामुक्तांचे प्रमाणही तुलनेने वाढत आहे.

सांगली ः जिल्ह्यात आज 689 जण कोरोनामुक्त झाले. नवे 393 रुग्ण आढळले. नव्या कोरोना रुग्णांचा घटता आलेख कायम असून, कोरोनामुक्तांचे प्रमाणही तुलनेने वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास अडीच ते तीन पटीने घटली आहे. जिल्ह्यात आज 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. 

मृतांमध्ये खानापूर, जत, आटपाडी, तासगाव तालुक्‍यांतील प्रत्येकी दोन, वाळवे तालुक्‍यातील सहा पलूस आणि मिरज तालुक्‍यातील एक, महापालिका क्षेत्रातील 3 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 932 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. दैनंदिन चाचण्यांची संख्या सरासरी तीन हजारांवर आहे. त्या तुलनेत रुग्णसंख्याही घटत असल्याचे सुचिन्ह आहे.

एकूण 1120 आरटीपीसीआर चाचण्यांपैकी 86 जण बाधित आढळले. 2179 चाचण्यांपैकी 321 जण बाधित आढळले. जिल्ह्यातील एकूण 34 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्समध्ये सध्या 1059 रुग्ण उपचार घेत आहेत. गृहअलगीकरणात 4 हजार 866 रुग्ण आहेत. सध्या 6 हजार 536 रुग्ण बाधित आहेत. 

जिल्ह्यातील चित्र 

  • उपचाराखालील रुग्ण- 6609 
  • बरे झालले रुग्ण- 30506 
  • एकूण मृतांची संख्या- 1403 
  • एकूण बाधित रुग्ण- 38518 
  • महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 14947 

संपादन : युवराज यादव


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: 689 corona free in Sangli district; 393 new patients; Death 19