esakal | बेळगावात 70 पोलिसांना कोरोनाची लागण; 40 जण आयसोलेशनमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावात 70 पोलिसांना कोरोनाची लागण; 40 जण आयसोलेशनमध्ये

बेळगावात 70 पोलिसांना कोरोनाची लागण; 40 जण आयसोलेशनमध्ये

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव : बेळगाव शहरात (belgaum city) पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध पोलिस ठाण्यांतील ७० पोलिस आणि २ गृहरक्षक दलाच्या जवानांना कोरोनाची लागण (corona positive) झाली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली. मंगळवारी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी डॉ. आमटे म्हणाले, 'बेळगाव शहरात पोलिसांसाठी (belgaum police) लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. (covid-19 vaccination) त्यामुळे सुदैवाने प्राणहानी झाली नाही, पण ७० पोलिस व २ गृहरक्षक दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ३० जण बरे झाले असून, त्यापैकी २७ जण कामावर हजर झाले आहेत. तिघे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत. कोरोनाबाधित ४० पोलिस आयसोलेशनमध्ये असून, त्यांच्यावर नोडल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. पोलिस व अधिकारी मिळून १४०० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. ९० जणांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. विविध आरोग्य समस्यांमुळे ४५ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. ९८ टक्के पोलिसांनी लस घेतली आहे. असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: कोविड सेंटरमधून पसार झालेला न्यायालयीन बंदी अखेर जेरबंद

लॉकडाउनसह (lockdown) सर्व सरकारी आदेशांचे पालन करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सकाळी, दुपारी व रात्री अशा ३ शिफ्टस केल्या आहेत. त्यांना मास्क, सॅनिटायजर्स, हँड ग्लोव्हज वाटप करण्यात येत आहेत. लॉकडाउन उल्लंघनाबाबत तपास कसा करायचा, अटक कशी करायची, वाहन जप्त करणे व अन्य विषयांवरही सर्वांना मार्गदर्शन केले आहे. सर्वांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. लस घेतली म्हणून दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. याचप्रमाणे पोलिसही सर्व खबरदारी घेत आहेत, असे डीसीपी आमटे म्हणाले.