वाढीव आराखड्यात रस्त्यांसाठी ७२ कोटी

Money
Money

सातारा - जिल्हा नियोजन समितीला पुढील वर्षाच्या आराखड्यात ४६ कोटी ७० लाख रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध झाला आहे. सर्वांधिक ७२ कोटींचा निधी ग्रामीण रस्त्यांसाठी उपलब्ध होणार असून, त्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडकसाठी ३९ कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहेत. 

जिल्हा नियोजनचा वार्षिक आराखडा २५४ कोटींचा होता. यामध्ये राज्य नियोजन समितीच्या बैठकीत आठ कोटी ३५ लाख रुपये वाढवून मिळाले आहेत. त्यामुळे वार्षिक आराखडा २६५ कोटींवर पोचला आहे. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी ३० कोटी निधी उपलब्ध झाला असून, वाढीव आठ कोटींचा निधी असा एकूण ४६ कोटी ७० लाख रुपयांचा वाढीव निधी नव्या वर्षात विकासकामांसाठी खर्च करण्यासाठी नियोजनला उपलब्ध झाला आहे. यातून ग्रामीण रस्त्यासाठी सात कोटी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी तीन कोटी १४ लाखांचा जादा निधी दिला जाणार आहे. यातून केवळ ग्रामीण रस्त्यांसाठी आगामी वर्षात ७२ कोटींचा निधी मिळणार आहे. या सोबतच अंगणवाडीसाठी एक कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तीन कोटी, नगर विकाससाठी पाच कोटी, पशुसंवर्धन विभागाला सव्वाकोटी, पंजाबराव देशमुख व्याज सवलतीसाठी एक कोटी, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांसाठी दीड कोटी, कारागृहात सीसीटीव्ही बसविण्यासाठी २५ लाख, लघुपाटबंधारे विभागासाठी सात कोटी ६२ लाख, साकवांसाठी साडेबारा कोटी, यात्रास्थळ विकासासाठी ५० लाख रुपयांचा वाढीव निधी दिला जाणार आहे.

या आठवड्यात संपूर्ण मंजुरी 
आमदार व खासदार निधीतील कामांना या आठवड्यात संपूर्ण मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागली तरी कामे करता येणार आहेत. खासदार निधीला ३१ मार्चचे बंधन नसते. त्यामुळे आगामी वर्षातही मंजूर कामे प्रत्यक्ष सुरू होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com