वाईतील ७५ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

वाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने येथील बाजार समितीत झालेल्या मोफत कृत्रिम पाय (जयपूर फूट) व पोलिओ कॅलिपर्स शिबिरात ७५ अपंगांच्या पायाची मापे घेण्यात आली. आता त्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जयपूर फूट प्रदान करण्यात येणार आहेत. वाई, महाबळेश्‍वर व खंडाळा तालुक्‍यांतील नागरिक यात सहभागी झाले होते.  

शिबिराचे उद्‌घाटन ‘लार्सन ॲण्ड टुब्रो’चे विभागीय व्यवस्थापक नितीन अग्रवाल यांच्या हस्ते झाले. या वेळी पोपटलाल ओसवाल, उपाध्यक्ष अनिल सावंत, वाई अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, प्रज्ञा कुलकर्णी, भारत विकास परिषद सातारा शाखेचे अध्यक्ष अनिल काटदरे, सचिव सतीश मुळे, डॉ. सुधीर जोशी, सुभाष जोशी, कंपनीचे अधिकारी विकल्प त्यागी, सतीश झांझड आदी उपस्थित होते. 

लार्सन ॲण्ड टुब्रोने दिव्यांगांना कोणाचाही आधार न घेता स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मोफत कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. पुणे व परिसरात ४०० हून अधिक अपंगांना आजवर पाय उपलब्ध करून दिलेले आहेत. ग्रामीण युवकांना नोकऱ्या देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमही हाती घेतल्याचे कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री. अग्रवाल यांनी सांगितले. ‘लार्सन ॲण्ड टुब्रो’ने सीएसआर फंडातून वाईच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती नगरसेवक दीपक ओसवाल यांनी केली. त्यास श्री. अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. श्री. सावंत यांनी दिनेश ओसवाल प्रतिष्ठान सेवाभावी काम करत असून, लोकसेवेच्या या कार्यात संधी उपलब्ध करून दिल्यास पालिका निश्‍चित सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. 
पोपटलाल ओसवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रकाश सावंत यांनी ओसवाल प्रतिष्ठानच्या, तर विनय खटावकर यांनी भारत विकास परिषदेच्या कार्याची माहिती दिली. अजित साळुंखे यांनी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमाची माहिती दिली. अरुण देव, दीपक ओसवाल यांनी स्वागत केले. विलासचंद्र देवी यांनी सूत्रसंचालन केले. दीपक ओसवाल यांनी आभार मानले.

Web Title: 75 handicapped Artificial Legs