Sangli Crime: 'स्टेट बँकेच्या पलूस शाखेची ७.६० लाखांची फसवणूक'; कर्ज घेऊन तिघांनी नाही फेडले
कर्जदारांनी ७ लाख ६० हजार रुपये कर्ज घेऊन ते न फेडता बँकेची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद गोरख मच्छिंद्र पाखरे (वय ४०, परांजपे कॉलनी, पलूस) यांनी पलूस पोलिस ठाण्यात दिली आहे. तिघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SBI Palus Branch where ₹7.60 lakh loan fraud case surfaced involving three borrowers.Sakal
पलूस: संगनमत करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पलूस शाखेस खोटे प्रमाणपत्र व खोटे सोने तारण देऊन त्याद्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता तिघांनी बँकेची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.