श्रीगोंदे - पोलिसांनी केली ऐंशी बाॅक्स दारु जप्त

संजय काटे
शनिवार, 21 जुलै 2018

श्रीगोंदे (नगर) : कोळगाव येथून राशिनला जाणाऱ्या देशी विदेशी दारुचा टेम्पो श्रीगोंदे पोलिसांनी मोठ्या शिताफिने शुक्रवारी मध्यरात्री पकडला. दोन लाखाचे दारुचे ऐंशी बाॅक्ससह एकुण साडेतीन लाखाचा ऐवज जप्त करताना दोघांना अटक केली. 

याप्रकरणी पोलिस कर्मचारी अमोल आजबे यांनी फिर्याद दिली. त्यांच्यासह रवी जाधव या दोघांना एका टेम्पोचा संशय आला. टेम्पो क्रमांक एम एच 12 एल टी 5617 याच्या चालकाला थांबविले. मात्र तो टेम्पोची झडती घेऊ देत नसल्याने या दोघा पोलिसांचा संशय बळावला. तातडीने त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे यांना माहिती देत पथक बोलाविले.  गाडी तपासली असता त्यात दारुचे बाॅक्स दिसले. 

टेम्पोसह 3 लाख 49 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त केला. यात दारुच्या ऐंशी बाॅक्सची किंमत दोन लाख रुपये आहे. पोलिसांनी आकाश तुळशीराम निकाळजे (वय 21) व सोमकुमार चंद्रम मेरुगुहार (वय 22) दोघेही राहणार राशिन (ता. कर्जत) यांना अटक केली आहे.

Web Title: 80 boxes of liquor seized by police in shrigonde

टॅग्स