9 Leopards Died In 16 Year In Shirala Taluka Sangli Marathi News
9 Leopards Died In 16 Year In Shirala Taluka Sangli Marathi News

धक्कादायक : १६ वर्षांत ९ बिबट्यांचा मृत्यू 

शिराळा (सांगली) : शिराळा तालुक्‍यात १६ वर्षांत ९ बिबट्यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी चांदोली उद्यानात असताना दोन तर उद्यानाबाहेर सात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्यांचा हा मुक्त संचार  शेतकऱ्यांना शेतात जाताना धडकी भरवणारा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा वावर कायमचाच आहे. त्यातील काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडले ते बाहेरच राहिले आहेत. ते बाहेर पडल्याने त्यांच्या बछड्यांचा जन्म शेतात व डोंगर कपारीत झाला.

त्यामुळे त्यांना जंगल माहीत नसल्याने उद्यानाबाहेरील परिसर हेच त्यांचे आश्रयस्थळ बनू लागले आहे. त्यामुळे त्यांचा वावर चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून ६० किमी अंतरापर्यंत आहे. अन्नाच्या शोधात फिरत असताना त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांना भक्ष्य बनवले जात आहे.शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असल्याने बिबट्याला राहण्यासाठी  सुरक्षित जागा आहे; परंतु काही वेळा त्यांना पुरेसे अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला तो कायमच. त्यामुळे मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळापूर, कुसाईवाडी, मांगले, मिरखेवाडी, बेरडेवाडी आदी परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारले आहे. अजूनही पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले सुरूच आहेत.

हेही वाचा - मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी
 
बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू

लादेवाडी येथे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू हा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात  झाला आहे. मे महिन्यात शेडगेवाडी-खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा जलसेतूवरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता. १४ सप्टेंबर २००४ ला खेड तालुक्‍यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या नर जातीच्या बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.

 विषबाधा झाल्याने मृत्यू
 
२०१६ ला वाकाईवाडी येथे विषबाधा झाल्याने २ तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात अन्न साखळी तुटल्याने एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. १ जानेवारी २०१५ ला कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेल्या बिबट्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. वाळवा तालुक्‍यातील येडेनिपाणी येथे महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळून  आला होता.

बिबटयाविषयी प्रबोधन गरजेचे

चांदोली राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडलेले बिबटे पुन्हा उद्यानाकडे न फिरकल्याने उद्यानाबाहेरील परिसर हेच त्यांचे आश्रयस्थळ बनले आहे. त्यामुळे त्यांना होणारी बछडीही परिसरात असणारा ऊस, छोटी छोटी जंगले हेच आपले आश्रयस्थळ मानत आहेत. परंतु हे आश्रयस्थळ पुरेसे नसल्याने ते नवीन आश्रयस्थळ व अन्नाच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे विविध भागात बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या दिसला तर काय करावे व हे का घडते याबाबत आम्ही गावोगावी प्रबोधन करून लोकांच्या मनात असणारी बिबट्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
- एस. आर. काळे, वनक्षेत्रपाल, शिराळा.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com