9 new power supply stations in Belgaum Khanapur
9 new power supply stations in Belgaum Khanapur

बेळगाव खानापूर तालुक्यात नवीन 9 वीज पुरवठा केंद्रे 

बेळगाव : ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठा करण्याकडे हेस्कॉमने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेळगाव व खानापूर तालुक्यातील 9 गावांमध्ये 220 ते 33 केव्ही सब स्टेशन उभारण्यात  येणार आहेत. यापैकी हिंडलगा, होणगा येथील सब स्टेशनचे काम  प्रगतीपथावर असून देसुर येथील काम पूर्ण झाले असून इतर ठिकाणी लवकरच काम हाती घेतले जाणार आहे. 


गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील जनतेला सुरळीत वीज पुरवठा करण्याकडे हेस्कॉमने लक्ष दिले दिले असून हेस्कॉमच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या सब स्टेशनवर भार पडत आहे त्यामुळे अनेकदा 
ट्रान्सफॉर्मर व फिडरमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ठीकठिकाणी सब स्टेशन निर्माण करून एकाच सब स्टेशनवर येणारा भार कमी करण्याचा प्रयत्न हेस्कॉमकडून केला जात आहे. त्यानुसार बेळगाव व खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये 33 ते 220 केव्ही सब स्टेशन निर्माण करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी निधी मंजूर झाला होता.

मात्र निधी मंजूर झाल्यानंतरही  हिंडलगा, होणगा येथील काम संथगतीने सुरू असल्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त झाल्यानंतर हेस्कॉमने काम लवकर सुरू करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. तर हलशी, नावगे व इतर ठिकाणी सध्या जागेच्या सपाटीकरण व इतर कामे हाती घेण्यात आली  असून कोरोनाच्या संकटामुळे काही ठिकाणी काम वेळेत सुरू होण्यास अडचण निर्माण झाली आहे. मात्र येत्या काही महिन्यात 3 ते 4 सब स्टेशन कार्यान्वित करण्यात येतील अशी माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली असून सब स्टेशन निर्माण झाल्याने सुरळीत वीज पुरवठा करण्यास मदत होणार असून नवीन सब स्टेशन केंद्राच्या जवळ हेस्कॉमकडून ग्राहक तक्रार निवारण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा-काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंडरस्टॅंडिंग ​

पुढील गावांमध्ये सब स्टेशन होणार आहे 
देसुर - 220 केव्ही 
हिंडलगा - 33 केव्ही 
हलशी - 33 केव्ही
बैलूर - 33 केव्ही
हुदली - 110 केव्ही
होनगा - 110 केव्ही
वंटमुरी - 110 केव्ही 
नावगे - 110 केव्ही 
किडचवाड - 110 केव्ही

निरंतर योजना लागू झाल्यानंतर आता ग्रामीण भागात सब स्टेशन उभारण्यात येत असुन काही ठिकाणी काम हाती घेण्यात आले आहे. तर काही ठिकाणी लवकरच काम सुरू होणार आहे 
प्रवीणकुमार चिकार्डे, सहायक कार्यकारी अभियंता

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com