वाड्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

वाडा - तालुक्याच्या विकासात महत्वाचे स्थान असलेली तालुक्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर पडली. ही आमसभा लावणा-या अधिका-यांला पाच हजार रूपयांचे बक्षीस शेकापतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तशा प्रकारचे निवेदन वजा तक्रार त्यांनी वाड्याच्या गटविकास अधिका-यांकडे केली असून संताप व्यक्त केला आहे.   

वाडा - तालुक्याच्या विकासात महत्वाचे स्थान असलेली तालुक्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर पडली. ही आमसभा लावणा-या अधिका-यांला पाच हजार रूपयांचे बक्षीस शेकापतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तशा प्रकारचे निवेदन वजा तक्रार त्यांनी वाड्याच्या गटविकास अधिका-यांकडे केली असून संताप व्यक्त केला आहे.   

पंचायत समितीच्या माध्यमातून वर्षातून एकदा तालुक्याची आमसभा भरवली जाते. तीमध्ये तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांवर नागरिक प्रशासनला जाब विचारतात. तिला सर्वच खात्यांचे प्रमुख हजर राहत असल्याने अनेक समस्या मार्गी लागतात. त्यामुळे तिला नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. मात्र वाड्यासारख्या ग्रामीण तालुक्यात गेली तीन वर्षं सलग आमसभा झाली नाही. गेल्या वर्षी सन 2017-18 वर्षीची आमसभा 29 जानेवारी 2018 रोजी सभेचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची वेळ ठरवून आयोजित करण्यात आली होती. सभेचा अजेंडा ही सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच यांना देण्यात आले होते. मात्र मंत्र्यांना वेळ नसल्याने ती रद्द करण्यात आली. ती पुन्हा घेतलीही नाही.    

आमसभेचे आमदार अध्यक्ष असतात. तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सचिव असतात. मात्र गेल्या चार वर्षांपासून या ना त्या कारणाने वाड्याची आमसभा होऊ शकलेली नाही. आमसभा न झाल्याने जनतेने विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण किंवा कोणती ठोस कार्यवाही संबंधित खात्याकडून झालेली नाही. तसेच अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.  

शेकापचे नेते सचिन मुकणे यांनी आज वाड्याच्या गटविकास अधिका-यांची भेट घेऊन आमसभा लावणा-या अधिका-यांस पाच हजाराचे बक्षीस देण्याचे जाहीर करून तशा प्रकारचे निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे. 

Web Title: aamsabha of wada delayed this year also