कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या अडकला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

आश्वी - संगमनेर तालुक्‍यातील आश्वी बुद्रुक येथील चतुरेवस्तीवर भक्ष्याच्या शोधात बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे बिबट्याला अर्धवट बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले.

येथील जगन्नाथ भिकाजी चतुरे यांच्या वस्तीवर असलेल्या गोठ्यात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने संरक्षक भिंतीवरून प्रवेश केला. मात्र, त्याच वेळी आत असलेल्या कोंबड्यांच्या लोखंडी खुराड्यात तो अडकला. घाबरलेल्या कोंबड्यांच्या कलकलाटाने जगन्नाथ चतुरे व त्यांचा मुलगा संदीप यांना जाग आली. त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकले. दरम्यान, बिबट्याने चतुरे यांच्या देशी कडकनाथ जातीच्या महागड्या दहा कोंबड्या मारल्या.

Web Title: aashvi nagar news leopard trapped