esakal | आटपाडी : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण ठार तर तिघे गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

accident

आटपाडी : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण ठार तर तिघे गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी ते दिघंची रस्त्यावर देशमुख महाविद्यालयात समोर आणि आटपाडी ते निंबवडे रस्त्यावर खंडोबाचे टेक या दोन ठिकाणी दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झालेत. मनीष चंद्रकांत लांडगे वय.१८. ( रा.साठेनगर आटपाडी) आणि दिनकर राजाराम गोडसे वय.६० रा.सोमेवाडी ता.सांगोला अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही अपघाताची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केलेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिघंची ते आटपाडी रस्त्यावर पोलीस स्टेशन जवळ रात्री दहाच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे चौकातून बाजार पटांगणाकडे नंबर नसलेली केटीएम-डीयुकेई गाडी भरधाव वेगाने निघाली होती. तर बाजार पटांगणाकडून साठेनगर चौकाकडे मोटर सायकल एम. एच. १०. बीई ५१९९ चालली होती. या दोन्ही मोटरसायकलची महाविद्यालयाच्या समोर भीषण जोरदार धडक बसली. मोटरसायकल चक्काचूर झाली. यात मोटर सायकलवरील मनीष चंद्रकांत लांडगे वय 18 गंभीर जखमी झाला. घटनास्थळीच अति रक्तस्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मल्हारी लांडगे गंभीर जखमी झाला. त्याचा एक हात आणि पाय मोडला आहे. नंबर नसलेली मोटरसायकल सह चालक 25 फूट लांबवर फरफटत गेला होता. अपघातानंतर चालक, सोबत असलेली व्यक्ती आणि गाडी गायब झाली.

हेही वाचा: टेंभूच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम

निंबवडे रोड वरून सोमेवाडी चे दिनकर गोडसे आणि सोपान गळवे हे जांभूळ मिला मोटरसायकल क्रमांक एम एच 13 16 88 रविवारी रात्री साडेआठ वाजता चालले होते. त्यांच्या समोरून अप्पासो ऐवळे खंडोबा टेकावरून आटपाडीकडे गाडी क्रमांक एम. एच.दह. ए.सी. ने येत होते. दोन्ही मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दिनकर गोडसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाले. त सोपान गळवे आणि आप्पासो जवळे गंभीर जखमी झालेत. या दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही अपघाताची आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद केलेली आहे.

loading image
go to top