माझ्यावर राजकीय षड्यंत्र : अभिजीत बिचुकले 

Abhijit Bichukale
Abhijit Bichukale

सातारा : नो कमेंटस, नो कमेंटस, राजकीय षड्यंत्र, नो कमेंटस असे बोलतच आज बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पोलिसांच्या गाडीत बसला आणि रवाना झाला. सह दिवाणी न्यायाधीश आर.व्ही.पाटील यांनी बिचुकलेस धनादेश न वठल्याप्रकरणात जामीन दिला परंतु खंडणी मागण्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली. तूर्तास सोमवारपर्यंत बिचुकले बिग बॉसमध्ये दिसणार नसल्याने त्याचे चाहते हिरमूसले आहेत. 

धनादेश न वठल्याप्रकरणात गोरेगाव फिल्मसिटीतील 'बिग बॉस'च्या घरात जाऊन ताब्यात घेतलेल्या बिचुकलेस सातारा पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आज (ता. 22) हजर केले. त्याच्यावतीने ऍड. शिवराज धनवडे यांनी जामीन अर्ज दाखल केला. फिर्यादींचे वकील ऍड. संदीप संकपाळ यांनी विविध दाखले देत बिचकुलेस जामीन नाकारावा अशी विनंती केली. ऍड. धनवडे यांनी जामीन मंजूर व्हावा यासाठी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूने सुमारे अर्धा तास युक्तीवाद झाला. त्यानंतर बिचकुलेस जामीन मंजूर झाला. तेव्हा बिचकुलेने सुटकेचा श्‍वास सोडला. तोपर्यंत न्यायालयात सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरण पूढे आणले. याबाबत सुनावणी झाली. सरकारी वकील अनूराधा निंबाळकर यांनी या प्रकरणात कित्येक वर्ष हवा असलेला संशियातस जामीन देऊ नये असे न्यायालयास नमूद केले.

निंबाळकर यांचे म्हणणे ग्राह्य मानून बिचुकलेस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान न्यायालयातून पोलिस स्टेशनला नेताना बिचुकले प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. केवळ नो कमेंटस... नो कमेंटस असे म्हणणाऱ्या बिचुकलेने अखेरीस राजकीय षडयंत्र असल्याचे शब्द उचारले. 

बिचुकलेचे वकील ऍड. शिवराज धनवडे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. परिणामीअभिजीत बिचुकले आता सोमवारपर्यंत तरी बिग बॉस शोमध्ये रसिकांना दिसणार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com