निपाणी दर्ग्यातील अभिषेकास ३५४ वर्षाची परंपरा

देसाई सरकार घराण्यातर्फे आयोजन : मानकऱ्यांसह सवाद्य मिरवणूक
 Nipani Dargah
Nipani Dargah sakal media

निपाणी : दिवाळीनिमित्त बाळासाहेब देसाई-सरकार घराण्यातर्फे येथील हजरत पिरानेपीर साहेब दर्ग्यासह संत बाबामहाराज चव्हाण यांच्या समाधीस गुरुवारी (ता. ४) पहाटे अभिषेक (अभ्यंगस्नान) घातला. गेल्या ३५४ वर्षांपासून या अभिषेकाची परंपरा आहे.

 Nipani Dargah
'समजत नाही अशी मंडळी बोलतात', फडणवीसांचा पवारांना टोला

चव्हाण वाड्यातील संत बाबामहाराज चव्हाण यांच्या समाधीस नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार यांच्या हस्ते अभिषेक घातला. त्यानंतर मानकरी, लवाजम्यासह सवाद्य मिरवणुकीने दर्ग्यास गलेफ नेला. मानकरी व फकिराच्या उपस्थितीत वर्षातील पहिला अभिषेक घालून पूजा केली. त्यानंतर प्रसादाचे वाटप केले. विद्या मंदिर शाळेच्या मागील बाजूस असलेल्या संत बाबामहाराज चव्हाण यांच्या समाधीस पृथ्वीराज चव्हाण, रणजित देसाई, संग्राम देसाई यांच्या हस्ते अभिषेक घातला. संत बाबामहाराज चव्हाण भजनी मंडळाच्या कार्यक्रमासह आरती केली.

 Nipani Dargah
"रात्री करायच्या गोष्टी संजय राऊत दिवसा करतात"

यावेळी चव्हाण वारस व उरूस उत्सव कमिटीचे अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, पृथ्वीराज चव्हाण-सरकार, संग्राम देसाई-सरकार, रणजित देसाई-सरकार, विवेक मोकाशी, बंडा गंथाडे, प्रकाश मोहिते, सुजित गायकवाड, सुनील वाडकर, जयराम मिरजकर, संजय माने, संभाजी मुगले, जयसिंग कांबळे, बाबासो सुतार, शरद मळगे, सदाशिव डवरी, मछिंद्र डवरी, अतिश सुतार, शामराव कांबळे, राजू पैलवान, सागर हरेल, प्रवीण हेगडे यांच्यासह साळी समाज, मानकरी व भाविक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com