सक्षम, शाश्‍वत विकासासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सोलापूर - गावे सक्षम करण्यासाठी राज्य सरकार आता ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचेही नुकत्याच काढलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.

ग्रामीण भागामध्ये फक्त मूलभूत सुविधा निर्माण करणे एवढाच या अभियानाचा हेतू नाही, तर शाश्‍वत विकासासह गावे सक्षम बनविणे, हे या अभियानाचा मूळ उद्देश असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. या अभियानाला राज्यातील खासगी संस्था ज्या आर्थिक व तांत्रिक सहकार्य करणार आहेत. त्याचबरोबर त्या संस्था अंमलबजावणीतही सहभागी होणार आहेत. या संस्थांच्या सहयोगाने हे अभियान राज्यात कार्य करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट 2016 मध्ये यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीसाठी कार्पोरेट अधिकारी, राज्यमंत्री, शासकीय अधिकारी उपस्थित होते. या अभियानात अनेक संस्थांनी सहभाग दाखविला आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीची स्थापना केली आहे. त्या कंपनीमध्ये सरकारचे भागभांडवल उपलब्ध करून देण्यासही मंजुरी दिली आहे.

"सीईओ'च नोडल अधिकारी
या अभियानाचे नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Able, sustainable development of rural social change campaign