सध्याच्या सरकारडून सत्तेचा गैरवापर - शरद पवार

किरण चव्हाण
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला. 

माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला. 

पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पवार म्हणाले की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून अडवले जातयं, अडचण केली जातेय, मोर्चा गुंडाळायला सांगितले जातोय, हा ‌सत्तेचा गैरवापर सध्याचे सरकार करत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या हालचालीबाबत पवार म्हणाले, आरक्षणाचा निर्णय केला तर चांगला आहे. पण महाराष्ट्राची विधानसभा बोलवून ठराव करायचा अन् केंद्रात पाठवायचा. धनगर समाजाला केंद्र व राज्य शासनाच्यावतीने आदिवासी असल्याचे प्रत्यक्ष प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टीला काही अर्थ नाही. 

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होण्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघाडीबरोबरच्या चर्चा सुरू असल्याने भाष्य करणे योग्य नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा जागावाटपाबाबत प्रश्र्न संपला असून, डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर मित्रपक्षांबरोबर चर्चा सुरू आहेत. 

मनसेचा दृष्टीकोन एका विषयापुरता सिमीत असल्याचे ते म्हणाले. बहुजन वंचित आघाडीने आर.एस.एस.बाबत स्पष्ट भूमिका घेण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितल्याबाबत विचारले असता आर. एस.एस.च्या विचारशैलीला आमचा विरोधच आहे. आम्ही त्यांचे कधीही समर्थन करणार नाही. पुलगामा येथील हल्ला हा देशावरील हल्ला आहे. हल्ल्यानंतर सर्व पक्ष सैन्याचे मनोबल वाढण्यासाठी सरकारच्याबरोबर आहोत. परंतु, सर्जिकल स्ट्राइक व जवानांच्या योगदानाचा राजकीय फायदा घेण्याचा भाजप सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Abuse of power by current government - Sharad Pawar