एसी, कुलर नको रे बाबा!

किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर : आठ दिवसात मागणी वाढली
AC, Cooler
AC, CoolerSakal

निपाणी - शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढणारी उष्णतेची लाट प्रत्येकाला नकोशी झाली आहे. यातून बचावासाठी अनेक जण घरात कुलर, एसी बसवू लागले आहेत. परंतु वाढलेली मागणी लक्षात घेवून या वस्तूंच्या वाढलेल्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचल्या आहेत. त्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे इच्छा, गरज असूनही कुलर, एसी खरेदीकडे दुर्लक्ष केले जात आहे. उन्हाळ्यात मागणी वाढली की आपसुकच एसीचे दर वाढतात. या कालावधीत विक्रेते कोणतीही स्कीम देत नाहीत. त्यात यंदा १५ ते २० टक्क्यांनी एसीच्या किंमती वाढल्या आहेत. तर काही कंपन्यांनी नवीन प्रोडक्ट लाँच करत किंमती कमी केल्याचेही दुकानदारांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात अचानक निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जिवाची काहीली होत आहे. त्यामुळे कुलरला मागणी वाढली आहे. वाढती मागणी आणि महागामुळे कुलरमागे दर हज़ार ते दीड हजार रुपये वाढले आहेत. गतवर्षी कोरोनामुळे प्रत्येक कुटुंब घरात असूनही जेवढी कुलरची मागणी झाली नाही. त्यापेक्षा अधिक मागणी यंदा असल्याचे कुलर विक्रेते सांगत आहेत. गतवर्षीच्या मागणीचा विचार केला तर यंदा तीन पट मागणी वाढली आहे. बहुतांश घरी नवीन कुलर, एसी खरेदी केला जातो. त्यात काही कंपन्याही ऑफर देत आहेत. त्यामुळे ग्राहक खुश आहेत.

फ्रीजच्या मागणी वाढ

यंदा फ्रीजच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यात १५ ते २० हजारा दरम्यानचे फ्रीज अधिक विक्री होत असल्याचे दिसते. एससी, कुलर आणि रेफ्रीजरेटरच्या किंमती वाढल्या असल्या तरी मागील आठ दिवसात मागणी वाढली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे प्रोडक्शन बंद होते. त्यामुळे बहुतांश कंपन्यात मागणी असलेले मॉडेल उपलब्ध नसल्याने भाव वाढ झाली आहे. तर काही वस्तूचे दर घटले आहेत. प्रत्येक वस्तूमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- रोहित माळवे, फ्रीज, कुलर व्यापारी, निपाणी.

वाढलेले दर असे-

जुने दर नवे दर

कुलर ५,००० ६,३००

एसी २८,००० ३०,०००

फ्रिज १५,८०० १६,७००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com