बेळगाव : भीमराव यशवंत पवार यांच्या कार्यालय आणि घरावर एसीबीची छापेमारी

लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ACB raids Bhimrao Yashwant Pawar office and house Public Works Department belgaum
ACB raids Bhimrao Yashwant Pawar office and house Public Works Department belgaum sakal

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंते भीमराव यशवंत पवार यांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थान आणि नातेवाईकांच्या घरावर लाच लुचपत प्रतिबंधक खात्यात्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) छापेमारी केली. शुक्रवार (ता. १७) पहाटे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सर्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंते म्हणून सेवा बजावणारे भीमराम यशवंत पाटील यांच्या टिळकवाडी येथील घरावर कार्यालयावर त्याचबरोबर निपाणी येथील त्यांच्या स्वतःच्या घरावर आणि बोरगाव येथील पत्नी आणि मुलाच्या नावावर असलेल्या टेक्स्टाईल पार्कवर देखील एसीबी अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले. श्री. पाटील यांच्या एकूण सहा ठिकाणच्या मालमत्तावर एसीबी अधिकाऱ्यांनी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त केली. उत्तर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक बी. एस. न्यामगौडर, पोलीस उपअधीक्षक करूनाकर शेट्टी, प्रकाश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस. गुदोपोप्प, निरंजन पाटील, मंजुनाथ व यांच्यासह २५ हून अधिक सहकार्यानी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com