कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर ट्रकची धडक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बालिंगा पुलावर दोन ट्रकची समोर-समोर धडक झाली. धडक जोरदार झाल्याने दोन्ही ट्रकचालक जखमी झाले आहेत. 

सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे कोल्हापूरहून गोवा, पणजी, गगनबावडा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना अर्धा तासाहून अधिक काळ रस्त्यावरच ताटकळत थांबावे लागले. धडक झाल्यानंतर एक ट्रक रस्त्याखाली गेला तर दुसरा ट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने वाहनांची ये-जा थांबली.

जोरदार धडकण्याचा आवाज आल्याने बालिंगा परिसरातील ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी हा ट्रक बाजूला करत जखमींना बाहेर त्यानंतर जखमींना काढले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांकडे पाठवले.

Web Title: accident between 2 trucks on kolhapur gaganbawda road

टॅग्स