पांचवड गावानजीक अपघात, तीन ठार, तीन जखमी

विलास साळुंखे 
सोमवार, 8 एप्रिल 2019

भुईंज - महामार्गावर पांचवड गावानजीक कार आणि दुचाकी अपघातात तीनजण ठार तर तीन जखमी झाले आहेत. सकाळी 9 च्या दरम्यान हा अपघात झाला.  

संतोष नामदेव माळी (वरुड तालुका खटाव) व अक्षय विध्याधर कांबळी (वय 28 राहणार गोडोली सातारा) अशी मृतांची नावे आहेत. जखमी व तिसऱ्या मृताचे नाव समजू शकले नाही

भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बाजूने साताऱ्याला जाणारी फोर्ड फियास्ट (MH0l BB6279) या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्ता दुभाजक तोडून कार सातारा बाजूने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला (MHJW 9859) धडकली. या अपघातात दुचाकीस्वारासह तीनजण ठार झाल्याची माहिती मिळाली तर तीनजण जखमी झाले, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत. 

अपघातानंतर घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनी श्याम बुवा, पीएसआय दुर्गानाथ साळी, हवालदार प्रवीण ढमाळ आदींनी भेट देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

Web Title: accident at bhuinj highway, three killed and three injured