महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक; चालक जागीच ठार

विजय लोहार
Sunday, 29 November 2020

पोटात स्टेरिंग घुसून ते त्यात अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नेर्ले (सांगली) : आशियायी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत चालक बसप्पा निजाप्पा पुजारी( वय ३८) रा.हिटगी,ता.चिक्कोडी ,जि. बेळगाव हा जागीच ठार झाला. तर सहचालक रुपेश भारत शिंदे (वय२६) रा.बंदूर, ता.कागल,जि. कोल्हापूर हा जबर जखमी झाला.अपघाताची नोंद कासेगाव पोलिसांत झाली आहे.काल पहाटे पाच च्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी

नेर्ले केदारवाडी हद्दीत फरशीने भरलेला ट्रक क्रमांक (एम. एच.१० सी.आर.९२४६) हा महामार्गावर बंद पडल्याने कोल्हापूर च्या दिशेने तोंड करून बाजूला थांबला होता. यावेळी ट्रक क्रमांक( एम. एच. ०९ इ.एम.४००१) हा   कराड कडून कोल्हापूरला चालला होता.धुके आणि पाऊस असल्याने व पहाटेची वेळ असल्याने चालक बसप्पा पुजारी यांचा ट्रक महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव भीषण धडक दिली. यात चालक पुजारी यांच्या पोटात स्टेरिंग घुसून ते त्यात अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहचालक रुपेश शिंदे हा सुदैवाने वाचला.त्याला हात व पायाला गंभीर दुखापत झाली

अपघाताची फिर्याद रुपेश शिंदे यांनी दिली आहे. असून गाडीचे अडीच-तीन लाखाचे नुकसान झाले आहे.हा अपघात इतका भीषण होता की गाडीचे इंजिन व समोरील बॉडी चक्काचूर झाले आहे. पहाटेच्या अपघातानंतर सकाळी नऊ साडेनऊ वाजता अपघातग्रस्त बाहेर काढण्यात आले.पोलीस हवलदार
सी.ए. पवार तपास करीत आहेत.

 महामार्गावर अपघात वाढले असून महामार्गावर चुकीच्या पध्दतीने वाहने उभी केल्यास अशा वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.
सहायक पोलिस निरीक्षक, सोमनाथ वाघ कासेगाव पोलीस ठाणे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident case in sangli