मोटारीच्या धडकेत महिला पोलीस कॉन्स्टेबल जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

सीपीआर चौकात कर्तव्य बजावत असताना शहर वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेतील महिला पोलीस कर्मचारी हिला मोटारीने धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. विद्या निवृत्ती वाळके असे त्यांचे नाव आहे. उपचारासाठी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मोटारचालक संजय पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोल्हापूर - सीपीआर चौकात कर्तव्य बजावत असताना शहर वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेतील महिला पोलीस कर्मचारी हिला मोटारीने धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. विद्या निवृत्ती वाळके असे त्यांचे नाव आहे. उपचारासाठी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मोटारचालक संजय पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाहतूक पोलीस कर्मचारी विद्या वाळके या आज दुपारी सीपीआर चौकात कर्तव्य बजावत होत्या. त्याच वेळी संजय पाटील (रा. केखले ता. पन्हाळा) हे या चौकातून मोटारीतून कसबा बावडाच्या दिशेने जात होते.  त्यांच्या मोटारीची वाळके यांना धडक बसली. त्यात त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तातडीने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनीही सीपीआरला भेट देऊन वाळके यांची विचारपूस केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in CPR Chowk one injured