बेरगळवाडी येथील घरनिकी फाट्यावर दोन एसटींचा अपघात दोन जखमी

सदाशिव पुकळे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

झरे - बेरगळवाडी (ता आटपाडी) येथे खरसुंडी झरे रस्त्यावरील घरनिकी फाटा बेरगळवाडी दरम्यान अरुंद रस्त्यामुळे दोन एसटीची धडक झाली. या अपघातामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. जखमींना खरसुंडी येथे प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले.

घरनिकी फाट्याजवळ सांगली - घरनिकी ही एसटी घरनिकीकडे जात होती तर झरे - आटपाडी एसटी झरेकडून येत होती. अरुंद रस्त्यामुळे आणि ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने या दोन्ही गाड्यामध्ये अपघात झाला. दोन्ही एसटी गाड्या रस्त्याच्या खाली उतरून बाजूच्या झाडाझुडपात घुसल्या. या अपघातामध्ये रखुमा कोंडीबा बेरगळ (वय 80) आणि रुक्मिणी शामराव ढोबळे (वय 60) या दोन महिला किरकोळ जखमी झाल्या.  त्यांना खरसुंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करण्यात आले.

आमदार बाबर यांचे सहकार्य

खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे त्या भागात होते. त्यांना अपघाताची माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळी जाऊन विचारपूस केली आणि संबंधित खात्यांना फोन करून जखमींना तातडीने उपचारासाठी मदत मिळवून दिली.

Web Title: Accident on Gharniki Phata two injured