मेंढपाळांच्या दक्षतेने टळली कोयना एक्सप्रेसची दुर्घटना  

मेंढपाळांच्या दक्षतेने टळली कोयना एक्सप्रेसची दुर्घटना  

मिरज -  पुणे रेल्वेमार्गावरील वाठार व पळशी स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग तुटल्याचे निदर्शनास येताच वेगाने येणाऱ्या कोयना एक्‍स्प्रेसला थोपवणाऱ्या दोघांचा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सत्कार केला. लहुराज कदम आणि शिवाजी श्रीरंग कदम अशी त्यांची आहेत. 

शुक्रवारी (ता. एक) मिरज - पुणे रेल्वे मार्गावर वाठार व मुळशी या दोन स्थानकां दरम्यानचा रेल्वेरूळ पूर्ण तुटल्याचे रुळाशेजारून जात असताना मोटार सायकलस्वार लहुराज कदम यांच्या निदर्शनास आले. याच वेळी त्यांना कोयना एक्‍स्प्रेस वेगाने येत असल्याचे दिसले. लहुराज कदम यांनी तातडीने मोटारसायकल थांबविली आणि तेथून काही अंतरावर उघड्या रानात मेंढ्या चारणाऱ्या शिवाजी श्रीरंग कदम यांना कोयना एक्‍स्प्रेस थांबवण्यासाठी रुळावरून गाडीकडे जाण्यास सांगितले. शिवाजी कदम हेही डोक्‍याला बांधलेला लाल रंगाचा छोटा टॉवेल फडकावत रेल्वेच्या दिशेने धावत सुटले, तसेच चालकास पाहून जोरात ओरडले. शिवाजी कदम यांच्या या हालचालींमुळे चालकाने तातडीने रुळ तुटलेल्या अंतरापासून काही फुटांवर गाडी थांबवली. रुळ तुटल्याचे पाहून चालकासही धक्का बसला. त्यांनी तातडीने याबाबत सर्व वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पुणे, सातारा आणि मिरजहून सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले. मार्गाची तात्पुरती दुरुस्ती करून कोयना एक्‍स्प्रेस मार्गस्थ करण्यात आली.

गाडीला दुर्घटनेपासून वाचवणाऱ्या लहुराज कदम आणि शिवाजी कदम यांच्यासह वडिलांचाही सत्कार वाठार रेल्वेस्थानकावर झाला. पुण्याचे अपर मंडल रेल प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा यांच्या हस्ते आणि सहाय्यक मंडल अभियंता योगेंद्र बैस, वरिष्ठ अभियंता संतोषकुमार गुंजन यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी कृतज्ञता सोहळा पार पडला. रवींद्र पुंडे आणि विकासकुमार मीना यांनी आयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com