धावत्या एसटीचे आपात्कालीन दार उघडले; सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

हुकूम मुलाणी
शनिवार, 31 मार्च 2018

मंगळवेढा : मंगळवेढा ते पंढरपूर या मार्गावर मंगळवेढा आगाराच्या बसमधील आपतकालीन दरवाजा अचानक उघडल्याने जत तालुक्यातील उटगी येथील सिध्दराया गुरुबसाप्पा माळाबगी  या सहा वर्षाच्या बालकाचा चालत्या एसटीतून पडून मागील चाक डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यू झाला.

सध्या पंढरपूर ते मंगळवेढा या महामार्गाचे काम सुरू असताना मंगळवेढा आगाराची बस क्र एम एच 20 बी.एल 0084 ही बस चालक शरद पाटील यांनी सदरची बस वेगात चालवली, अशी फिर्याद मयताचे वडील गुरबसाप्पा माळाबगी यांनी दिली.

या अपघातानंतर नागरिकानी गर्दी केली. अपघातानंतर आगारव्यवस्थापक  मोबाईलवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.

मुलाच्या अपघाती निधनाने माळाबागी कुटुंबाचा आधारवड गेला. मंगळवेढा आगारातील नादुरूस्त बसकडे आतातरी वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय असा प्रवाशांकडून विचारला जात आहे.

Web Title: Accident on Mangalwedha-Pandharpur road