गोकुळशिरगाव नजीक कंटेनर उलटला; रेंदाळचा एकजण ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

कोल्हापूर - पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी गोकुळ शिरगावनजीक कंटेनर उलटला. या अपघातामध्ये कटेनर खाली सातजण सापडले. यात एकाचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले आहेत.

कोल्हापूर - पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी गोकुळ शिरगावनजीक कंटेनर उलटला. या अपघातामध्ये कटेनर खाली सातजण सापडले. यात एकाचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले आहेत. प्रवीण पिराजी पाटील ( रा. रेंदाळ, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाऊस सुरू झाल्याने काहीजण झाडाखाली थांबले होते. या दरम्यान कंटेनर पुण्याहून बंगळूरला जात होता. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या एका बाजूला उलटला. त्यात सात जण कंटेनर खाली सापडले. त्यात एकाचा मृत्यू झाला. अन्य जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 

अपघाताची माहिती समजताच गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident near Gokulshirgaon one dead