कऱ्हाडजवळ भीषण अपघात; दोन तरुण ठार 

राजेंद्र ननावरे
मंगळवार, 11 जून 2019

- टेम्पो, कार व बुलेटचा तिहेरी अपघात

- बुलेटवरील दोन तरुण ठार. 

मलकापूर (कऱ्हाड) : टेम्पो, कार व बुलेटच्या तिहेरी अपघातात बुलेटवरील दोन युवक ठार झाले. महामार्गावर मालखेड येथे सायंकाळी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. इर्शाद इस्माईल शिकलगार (वय 21, रा. वडगाव हवेली) आणि सुरज भोला पासवान (24, सध्या रा. गोटे, मूळचा बिहार) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

बुलेटवर आणखी एकजण होता. तो यामध्ये जखमी झाला आहे. फिरोज इमतियाज खान (३२, रा. वडगाव हेवली) असे त्याचे नाव आहे. तिघेही बुलेटवरून कऱ्हाडकडे येत होती. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या टम्पेने त्यांच्या मागील कारला धडक दिली. त्या कारने त्यांच्या पुढून निघालेल्या बुलेटला जोरदार धडक दिली. त्या धडकेत दोघेही जागीच ठार झाली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मालखेडच्या रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. तिघेही पेठनाका येथील कामनिमित्त गेले होते. ते काम आटोपून तिघेही बुलेटवरून कऱ्हाडकडे येत होते. त्यावेळी मालखेडच्या हद्दीत हॉटेल वरद समोर दुर्घटना झाली. त्यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने कारला धडक दिली. कारने बुलेटला जोरदार धडक दिली. धडकेमध्ये बुलेटवरील दोघेजण जागीच ठार झाले. 

बुलेटवरील तिसरा फिरोज खान जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. देखभाल विभागाचे पोलिस कर्मचारी व तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक भापकर त्वरित घटनास्थळी आले. त्यांनी अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. जखमींना मदत करून घटनेचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident in Near Karad Two Died