Accident News: पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या भविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात सहा जण ठार

चारचाकीची ट्रॅक्टरला धडक बसल्यानंतर ट्रॅक्टरचा पुढील भाग पूर्णत: चारचाकीत घुसल्याने जागीच पाचजण ठार
Accident News
Accident NewsEsakal

मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात एका बारावर्षीय मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. दोन मुली जखमी आहेत. मृत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहेत. ते देवदर्शनासाठी पंढरपूरला चारचाकी गाडीतून निघाले होते.

काल सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताची भीषणता भयावह होती. चारचाकीची ट्रॅक्टरला धडक बसल्यानंतर ट्रॅक्टरचा पुढील भाग पूर्णत: चारचाकीत घुसल्याने जागीच पाचजण ठार झाले. तर उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. तसेच दोन मुली जखमी झाल्या.

मृत्यू झालेल्यांत चारचाकी गाडीचा चालक उमेश उदय शर्मा (वय २२, रा. शियेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), जयवंत दत्तात्रय पोवार (वय ४२, रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्नेहल जयवंत पोवार (वय ४०), सोहम जयवंत पोवार (वय १२), लक्ष्मण शंकर शिंदे (वय ७०, रा. बानगे, ता. कागल, जि. कोल्हापूर), कमल श्रीकांत शिंदे (वय ५६, रा. रोहिदासनगर इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हे ठार झाले तर मुलगी साक्षी जयवंत पोवार आणि श्रावणी जयवंत पोवार हे जखमी झाले आहेत.

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातील जयवंत पोवार हे पत्नी स्नेहल पोवार, मुलगा सोहम पोवार, दोन मुली साक्षी पोवार, श्रावणी पोवार कुटुंबासह पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. त्यांनी इचलकरंजी येथील नातेवाइकांना सोबत घेतले होते.

Accident News
Eknath Shinde: “एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले, त्याच तुकड्यावर...", नेत्याचा मोठा खुलासा

वड्डी येथे राजीवनगर येथे बायपासला हा अपघात झाला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा मालगाव फाटा ते मिरज टप्पा अपूर्ण होता. तो दोन दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. या रस्त्यावरून भरधाव वाहतूक सुरू झाली आहे. याआधी रस्ता बंद असताना अनेक वाहने उलट-सुलट दिशेने हवी तशी धावत होती. आजही या भागातील एक वीट वाहतूक करणारी ट्रॅक्टर ( एमएच १० डीजी ८६८३) उलट दिशेने येत होती.

चारचाकी गाडी (एमएच ०९ डीए ४९१२) चालकाला अशा पद्धतीने ट्रॅक्टर येईल, हे अपेक्षित नसावे, त्यामुळे त्याची जोरदार धडक झाली. चालक उमेश शर्मा, जयवंत पोवार, पत्नी स्नेहल पोवार, मुलगा सोहम पोवार आणि नातेवाईक लक्ष्मण शिंदे, कमल शिंदे यांचा मृत्यू झाला. तर पोवार यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या, यामध्ये श्रावणी हिच्या मेंदूला मार लागला असून, साक्षीच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident News
PM मोदी यांचे निकटवर्तीय कटारिया यांचे निधन; ७२ व्या वर्षी खासदाराने घेतला अखेरचा श्वास

दुसऱ्या दिवशी घटना

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तानंग फाटा ते मिरज रजपूत रॉयल गार्डनपर्यंत बंद करण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक मिरज शहरातून वळविण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी या अकरा किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी मिरज शहराबाहेरून हा रस्ता सुरू केला होता. अवघ्या दुसऱ्या दिवशी हा भीषण अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला.

पोवार कुटुंबातील दोन मुलींचा आधार हरपला

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका तालुक्यातील असलेले पोवार कुटुंबावर काळाने घाला घालून दोन मुलींचे आई-वडील आणि भाऊ हिरावल्यानंतर त्या मुलींचा आधार हरपल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती.

Accident News
Nagpur : दिव्यांगांच्या हाती पुन्हा ई-रिक्षाचे स्टेरिंग; ७४ गरजूंना मिळणार वाहन परवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com