एसटी बस-ट्रकच्या  धडकेत सात जण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

उत्तूर (कोल्हापूर)  ः निपाणी-गोवा अंतरराज्य महामार्गावर बहिरेवाडी (ता.आजरा) एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन 7 जण जखमी झाले. आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, उत्तूर येथील कार्यक्रम आटोपून कोल्हापूरकडे परतणाऱ्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जखमींना तातडीने गडहिंग्लजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

एसटी बस (एमएच 14 बीटी 4870) कोल्हापूरवरून उत्तूरमार्गे आजऱ्याकडे चालली होती. यावेळी आजऱ्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच 09 क्‍यू 6207) चालकाचा ताबा सुटून ट्रक बसवर येऊन आदळला. यामध्ये बसमधील संभाजी कांबळे (रा. भादवण), युवराज आयवाळे, अब्दुल इंचनाळकर, सुषमा उंचावळे, महादेव मिसाळ, संभाजी सावंत, मालूबाई पाटील (सर्व रा. बहिरेवाडी) जखमी झाले. त्याचवेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हापूरकडे चालला होता. मुश्रीफ यांनी घटनास्थळी थांबून अपघाताची माहिती घेत बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद राळभाते यांना जखमींना गडहिंग्लज ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जखमींना घेऊन पोलिस गाडी व मुश्रीफांच्या ताफ्यातील एका मोटारीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद आजरा पोलिसांत झाली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार कोचरगी व पोलीस नाईक वर्णे करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on S t bus and truck