पन्हाळा तालुक्यातील सैनिकाचा प्रशिक्षणादरम्यान अपघाताने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

  • प्रशिक्षण घेत असताना रोपवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू. 
  • अनिकेत सुभाष मोळे (22, रा. घरपण, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव
  • 2017 मध्ये मराठा बटालियनमध्ये भरती. 

पणुत्रे - प्रशिक्षण घेत असताना रोपवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिकेत सुभाष मोळे (22, रा. घरपण, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. 

अनिकेत हे 2017 मध्ये मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. दोन वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांना बढती मिळाली होती. बढतीच्या पदाचे प्रशिक्षण घेण्यासाठी काही दिवसापूर्वी ते बेळगाव येथील प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले होते. गुरुवारी सायंकाळी सरावादरम्यान रोपवरुन ते कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्कराच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. पोटात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे निधन झाले. ते अविवाहीत होते. अनिकेत यांचे बंधूही लष्करात सेवा बजावत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of a soldier from Panhala taluka during training