फरार आरोपीने केला पोलिसावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

तालुक्यासह इतर जिल्ह्यातील खून, दरोडे मारामाऱ्या, वाळूचोरी सारखे 15 ते 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आरोपी रविंद्र काळे याच्यावर विविध ठाण्यात दाखल आहेत. परंतु, तो फरार होता तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर वाळूचोरीप्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांना तो हवा होता.
 

मंगळवेढा-  तालुक्यासह इतर जिल्ह्यातील खून, दरोडे वाळूचोरीसारख्या गंभीर गुन्ह्यात मोक्काअंतर्गत गुन्ह्याचे आरोप असलेला फरारी आरोपी रविंद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे याला तामदर्डी येथे अटक करण्यात आली अटके दरम्यान सात ते आठ लोकांनी कुऱ्हाडी सह पोलिसांवरच हल्ला केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यासह इतर जिल्ह्यातील खून, दरोडे मारामाऱ्या, वाळूचोरी सारखे 15 ते 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आरोपी रविंद्र काळे याच्यावर विविध ठाण्यात दाखल आहेत. परंतु, तो फरार होता तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर वाळूचोरीप्रकरणी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांना तो हवा होता.

दरम्यान, शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सदर आरोपी तामदर्डी या ठिकाणी आल्याचे पोलिसांना समजताच  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी खांडवी साहेब, पो. नि. प्रभाकर मोरे, सपोनि बिराजदार, संदीप धांडे, गुन्हे शाखेचे पोलीस काझी यांच्यासह 70 पोलिसांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास कारवाई केली ही कारवाई  सुरू असताना सात ते आठ लोकांनी कुऱ्हाडी सह पोलिसांवरच हल्ला केला. दरम्यान यात पोलीस कॉन्स्टेबल धनंजय आवताडे यांच्या हाताला जखम झाली आहे, याबाबत कॉ. धनंजय आवताडे यांनी विविध गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना आरोपी 1) रविंद्र ऊर्फ पपुल्या रामा काळे व 2) अमोल उर्फ सौदागर शरणाप्पा भोसले (पारधी वस्ती ,तामदर्डी ता.मंगळवेढा) यातील रविंद्र याने अंगावर कुऱ्हाड घेऊन येऊन हातावर मारीत असताना उजव्या हाताच्या बोटावर जखम झालेली असून शासकीय कामात व पोलिसांवर कुऱ्हाडीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.

Web Title: Accused attack on Police