आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही - शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नगर - शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि निष्ठावान शिवसैनिक वसंत ठुबे यांची निर्घृणपणे हत्या झाली. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. दोन्ही कुटुंबीयांच्या पाठीमागे पक्ष खंबीरपणे उभा राहील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून श्रद्धांजली अर्पण केली.

केडगाव येथे दहा दिवसांपूर्वी उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या झाली. त्यांचा आज दशक्रिया विधी होता, त्या वेळी शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, की घटना घडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते यांना नगरला पाठविले होते. कार्यकर्ता ही शिवसेनेची संपत्ती आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन्ही कुटुंबीयांना कधीच अंतर देणार नाहीत. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही.

"साहेब, त्यांना फाशी द्या'
साहेब, मारेकऱ्यांना सोडू नका, त्यांना फाशी द्या! मी स्वतःला सावरीन, मला पण लढायचंय माझ्या पतीसारखं. सीमेवर जवान शहीद होतात, तसे माझे पती शिवसेनेसाठी शहीद झाले. आमचं कुटुंब उद्‌ध्वस्त झालं तसं अजून दुसरं कुटुंब उद्‌ध्वस्त होऊ देऊ नका. लई अत्याचार झालेत नगर जिल्ह्यात, हे कुठंतरी थांबवा, अशी याचना मृत वसंत ठुबे यांच्या पत्नी अनिता ठुबे यांनी मंत्र्यांसमोर मांडली.

Web Title: accused hanging eknath shinde