शिराळा पोलिसांचा कौतुक सोहळा जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न

शिराळा पोलीस ठाण्याने देशपातळीवर मिळवलेले यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान आहे.
Jayant Patil
Jayant PatilSakal
Updated on

शिराळा - शिराळा पोलीस ठाण्याने देशपातळीवर मिळवलेले यश हा खऱ्या अर्थाने पोलिसांचा बहुमान आहे. पोलिसांच्या बद्दल लोकांच्यात आत्मीयता वाढली तर नावलौकीक वाढण्यास मदत होते. हे शिराळकरांनी सिद्ध केले आल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

शिराळा येथील साई सांस्कृतिक हॉल मध्ये शिराळा पोलीस ठाण्याचा देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे यादीत सातवा क्रमांक आल्याबद्दल आयोजित कौतुक सोहळ्यात बोलत होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, शिराळा पोलीस ठाण्याचे यश हे सर्वांना प्रेरणादायी आहे. आय. एस. ओ. मानांकनामुळे पोलीस ठाण्यांचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात स्वच्छता व नीटनेटकेपणा आला आहे. बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पोलीस प्रशासनाने आमूलाग्र बदल घडवले आहेत. शिराळा पोलीस ठाण्याला मिळालेला दर्जा काय ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. कोणावर विनाकारण अन्याय होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

Jayant Patil
लॉकडाऊनच्या धास्तीने जोतिबा डोंगरावर हाऊस फूल्ल; दोन किलोमीटर दर्शन रांग

विश्वजित कदम म्हणाले, महाराष्ट्रात सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून शिराळा पोलीस ठाण्याची निवड झाली आहे. याचा सार्थ अभिमान असून यामुळे शिराळचीच नव्हे तर सांगली जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. कोरोनाच्या काळात पोलीस प्रशासनाने केलेले काम उल्लेखनीय आहे.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार व कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे हे फलित आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाने शिराळा तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकले आहे. शिराळा शहर व परिसरात तसेच प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालकमंत्री जयंतराव पाटील लवकरात लवकर पाठपुरावा करावा.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया म्हणाले,सांगली जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचा दर्जा चांगला आहे.शिराळा पोलीस ठाण्याला मिळालेला बहुमान हा सर्व कर्मचाऱ्यांना ऊर्जा देणारा आहे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. स्वागत व प्रास्ताविक पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी केले.

यावेळी विराज उद्योगसमूहाचे अध्यक्ष विराज नाईक, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचलन डॉ.सुरज चौगुले यांनी केले.आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबूले यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com