लॉकडाऊनच्या धास्तीने जोतिबा डोंगरावर हाऊस फूल्ल; दोन किलोमीटर दर्शन रांग

कोरोना नंतर येणाऱ्या ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे लॉकडाऊन होईल या भीतीने आज राज्यभरातील भाविकांनी जोतिबा डोंगर गाटला. परिणामी, डोंगर हाऊस फूल्ल झाला.
Jotiba Temple
Jotiba TempleSakal
Updated on

जोतिबा डोंगर - कोरोना नंतर येणाऱ्या ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे लॉकडाऊन होईल या भीतीने आज राज्यभरातील भाविकांनी जोतिबा डोंगर गाटला. परिणामी, डोंगर हाऊस फूल्ल झाला. आज दिवसभरात दोन लाख भाविक डोंगरावर आले. मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. आज मोठ्या गर्दीमुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांग लागली. ठाकरे मिटके गल्लीतून ज्योतिबा एसटी बस स्थानकापर्यंत दर्शन रांग लागली. भाविकांना या गर्दीत श्रींचे दर्शन घेतले.

लॉक डाऊन झाल्यावर सुमारे वर्षभर देवाचे दर्शन घेता येणार नाही. या आशेने आज भाविक सहपरिवार डोंगरावर आले. या गर्दीमुळे यंत्रणेवर मोठा ताण पडला. आज मंदिरात पहाटे घंटानादानंतर धार्मीक कार्यास प्रारंभ झाला.

Jotiba Temple
कळपाच्या प्रतीक्षेत संतापतोय गणेश तस्कर

त्यानंतर पाद्यपूजा, काकड आरती मुखमार्जन झाले.त्यानंतर अभिषेक विधी झाला. त्यानंतर श्रीची पगडी रुपातील सरदारी महापूजा बांधण्यात आली. आज पहाटेपासूनच डोंगर गर्दीने फुलून गेला. आज दिवसभर उन्हाचा तडाखा होता. उन्हात उभे राहून सर्रास भाविकांनी दर्शनाचा आनंद लुटला. आज मंदिर परिसर, सेंट्रल प्लाझा, यमाई मंदिर व बाग या ठिकाणी भाविकांनी उन्हामुळे विश्रांती घेतली. डोंगर आज शोशल ड्रिस्ट्रींगचा फज्जा उडाला .पंचाहत्तर टक्के भाविकांकडे मास्कच न्हवते. भाविक बिनधास्त फिरत होते. आज डोंगरावर कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरिक्षक शीतल कुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त होता. डोंगरावर सर्वत्र श्वान ही फिरविले.

इचलकरंजी येथील सतेज फायटर च्या पंधरा कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल इचलकरंजी ते जोतिबा हा ५५ किलोमीटर अंतराचा प्रवास पायी पूर्ण करत दंडवत घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Krishna River water level today
Nipani flyover wall collapse after heavy rain
Fertilizer Shortage India
Best places to visit in Shirala during monsoon
Marathi News Esakal
www.esakal.com