सांगलीत जनता कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका   

विजय लोहार 
Tuesday, 8 September 2020

वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातील ही पहिलीच कारवाई आहे.

नेर्ले (जि. सांगली) - वाळवा तालुक्यातील पेठ येथे जनता कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पेठ यांच्यावतीने दंडात्मक कारवाई करून सोळा हजार पाचशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील ही ग्रामीण भागातील ही पहिलीच एवढी मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे दुकानदार आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातील ही पहिलीच कारवाई आहे. पेठ ग्रामप्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या या धाडशी निर्णयाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा.
 पेठ (ता. वाळवा) येथे  १० तारखेपर्यंत जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. संबंधित कालावधीत नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आठ ते दहा दुकानदारांवर कायदेशीर कारवाई केली. यात साडे सोळा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने वेळो वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूचना देत आहे. परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण ,तलाठी  राहुल काळे, सांगली जिल्हापरिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, उपसरपंच  दीपक कदम, ग्रा.प. सदस्य शंकर पाटील, अमीर ढगे, चंद्रकांत पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष धनपाल माळी, विकास पेठकर, गोरख मदने, आनंदराव कदम, बरकत अली जमादार, अशोक माळी, प्रदीप कदम उपस्थित होते.

हे पण वाचा - जनता कर्फ्युबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

 

कोरोनाची महामारी सुरू आहे. दुकानदार, व्यापारी  आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे. बेजबाबदारपणे मास्क न वापरणे, बंद काळात दुकाने उघडणे, कायद्याचे पालन न करणे, या बाबत दंडात्मक व कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील.

हे पण वाचा एकावं ते नवलच! बायकोची हौस पुरवविण्यासाठी केली चक्क या गोष्टींची चोरी

 

-एम. डी. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, पेठ ग्रामपंचायत  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action on Curfew violations in sangli walwa