सीना नदीपात्रातील अतिक्रमणांवर बुलडोझर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नगर : सीना नदीपात्रातील अतिक्रमणांवर आज कारवाईस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आज नगर-पुणे रस्त्यावरील पुल व ल रेल्वेस्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळून दोन पथकांनी ही कारवाई सुरु केली.

पुराच्या पाण्याचा सर्वाधिक धोका असलेले पाच किलोमीटरचे क्षेत्र कारवाईसाठी प्राधान्याने निवडण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी या महामोहीमेस प्रारंभ झाला. 

महसूल, महापालिका, पोलिस, पाटबंधारे, उपप्रादेशिक परिवहन व भूमी अभिलेख कार्यालयासह संबंधित सर्वच विभागांचे पन्नासवर कर्मचारी कारवाईत सहभागी झाले आहेत. प्रत्येक विभागातील किमान तीन अधिकाऱ्यांना कारवाईत सहभागी होण्याची ताकीद जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली होती. त्यानुसार ही दोन पथकांद्वारे कामास प्रारंभ झाला. कारवाईस एकाच वेळी तीन ठिकाणी प्रारंभ होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले होते. तथापि, तेवढ्या प्रमाणात पोकलेन उपलब्ध न झाल्याने दोन पथकाद्वारे आज नगर-पुणे रस्त्यावरील पूल ते लोखंडी पूल, अशी कारवाई सुरु झाली. 

"ते' गुन्हेगार सापडलेच नाहीत..! 
मागीलवर्षी जून महिन्याच्या प्रारंभी नदीपात्रात लोखंडी पुलाजवळ एका स्थानिक लोकप्रतिनिधीने मातीचे भराव टाकून नदीपात्र अगदीच चिंचोळे करुन ठेवले. तेथे त्यांना नदीपात्रात व्यावसाय थाटायचा होता. मात्र, त्याच वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कोतवाली पोलिसांत तक्रार अर्ज दिला. त्यानंतर उर्वरीत भराव टाकण्याचे काम थांबले. मात्र, टाकलेला भराव यावर्षीपर्यंत तसाच नदीपात्रात होता. तो काढण्यास प्रथम प्रारंभ झाला. मात्र, पोलिसांना भराव टाकणारे गुन्हेगार आजपर्यंत सापडलेच नाहीत, हे विशेष. 

Web Title: action on encroachment on seena river area