मोहोळ : पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी 389 कोटींचा कृती आराखडा

An action plan of above three hundred crore has been prepared for water supply schemes
An action plan of above three hundred crore has been prepared for water supply schemes

मोहोळ : तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने विविध गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसाठी 389 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. दुष्काळच्या पार्श्वभूमीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

हा आरखडा वरिष्ठांकडे मंजुरीला पाठविल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी दिली. चालू पावसाळ्यात जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे चारा टंचाई व पाणीटंचाईने उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभाग व कृषी विभागाने चाराटंचाईसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. 10 जानेवारीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी याबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्या दुष्काळावर मात करण्याबाबत व नागरिकांना त्रास न होणेबाबत योजना सांगितल्या होत्या.

या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली. यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मोहोळ तालुक्यात आढावा बैठक घेतली होती. त्यात सभापती उपसभापती जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच तलाठी ग्रामसेवक यांनी सुचविलेल्या उपायोजनाचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

सुचविलेल्या उपाययोजना व त्यावरील खर्च पुढीलप्रमाणे-

  • जुन्या पाणीपुरवठा योजना दुरुस्ती- 24 खर्च 36 लाख पन्नास हजार
  • विंधन विहिरी विशेष दुरुस्ती- 151 खर्च पंधरा लाख दहा हजार
  • नवीन विंधन विहिरी घेणे -256 खर्च एक कोटी 28 लाख रुपये
  • तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना- 10 खर्च सोळा लाख पन्नास हजार
  • नदीत बुडकी घेणे- 10 खर्च 5 लाख 50हजार
  • विहिरी खोल करणे गाळ काढणे- 42 खर्च 60 लाख 50 हजार
  • विहिरी अधिग्रहण- 33 खर्च 33 लाख
  • ट्रॅक्टर बैलगाडीने पाणीपुरवठा करणे- 46 खर्च 94 लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com