गाव जत्रेतील अनुचित प्रकारांना आळा बसण्यासाठी पोलिसांचा कृती आराखडा

संदिप कदम
रविवार, 1 एप्रिल 2018

कायदा व सुव्यस्थेला बाधा निर्माण करणारे अवैद्य दारु व्यावसायिक व मटका चालकांवर प्रामुख्याने कारवाई करण्याचे मुख्य उद्दिष्ठ समोर ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर वाळू उपसा व वाहतुकीवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगितले.

फलटण शहर (जि. सातारा) - तालुक्यात सद्या गाव जत्रा व यात्रांंना सुरवात झाली असून चालु वर्षी जत्रा कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गावोगावी सुरु असलेल्या दारु विक्री व मटाका बंदीसाठी प्रभावीपणे करावाई करण्यासाठी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक पवन बन्सोड यांनी कृती आराखडा तयार केला.

कायदा व सुव्यस्थेला बाधा निर्माण करणारे अवैद्य दारु व्यावसायिक व मटका चालकांवर प्रामुख्याने कारवाई करण्याचे मुख्य उद्दिष्ठ समोर ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर वाळू उपसा व वाहतुकीवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस ग्रामीण पोलिस निरिक्षक अशोक शेळके उपस्थित होते. सद्या सुरु असलेल्या यात्रा कालावधीत कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्यास त्याबाबत पोलिस विभागाची रितसर परवानगी घेवून सदर कार्यक्रम रात्री 10 वाजेपर्यंत बंद करावेत. ध्वनी प्रदुषण प्रतिबंध कायद्याचे उल्लंधन करुन आवाजाची मर्यादा अथवा डि जे वाजवल्यास कारवाई करण्यात आली. फेक्स लावायचे झाल्यास त्याची ग्रामपंचायत परवानगी तसेच परवानगी तारिख व मुदत टाकणे आवश्यक आहे. तर फेक्सवर आपेक्षाहार्य मजकूर अथवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे पोस्टर लावल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मागील वर्षी यात्रा कालावधीत ज्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला व गुन्हे दाखल झाले अशा गावातील संबंधीत 86 व्यक्तीविरुद्ध तडीपारचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेेत.

ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील (ता. 30) रोजी चार ठिकाणी दारु विक्रीवर छापा व 1 ठिकाणी जुगार छापा टाकण्यात आला आहे. गावात अवैध धंदे सुरु असल्यास त्यांची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून माहिती देणारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील असे सांगितले. त्याचबरोबर सर्वच गावातील ग्रामदैवतांच्या यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्तांना शुभेच्छा देवून यात्रा कालावधीमध्ये शांतता व ससुव्यवस्थेसाठी आवाहन केले.

 

Web Title: Action Plan For Village Fairs in Satara Faltan