खासगी सावकार सूरज साखरे,अभी महाडिकच्या घरांची झडती

खासगी सावकार सूरज साखरे,अभी महाडिकच्या घरांची झडती

कोल्हापूर - खासगी सावकार सूरज साखरेसह त्याचा साथीदार अभी ऊर्फ युवराज महाडिकवर ‘मोका’ कारवाईनंतर आज जुना राजवाडा पोलिसांनी दोघांच्या घरांची झडती घेतली. तेथून कर्जदारांची स्वाक्षरी असलेले कोरे स्टॅम्प तसेच अन्य कागदपत्रे जप्त केली. अपहरण प्रकरणात कोठडी संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर केले. सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

दरम्यान, मंगळवारी परवानगी घेऊन बुधवारी त्यांना मोका न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साखरे आणि महाडिकने साथीदारांसह गगनबावडा तालुक्‍यातील शेतकरी रणजित बाबूराव पाटील यांचे अपहरण केले. त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली. त्यांनी फिर्याद दिल्यानंतर साखरे, महाडिकसह अन्य संशयितांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, साखरे, महाडिकच्या घरांच्या झडतीत कर्जदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले कोरे स्टॅम्प आणि काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले. ही कागदपत्रे पोलिसांनी आज न्यायालयात सादर केली. ही कागदपत्रे मोका अंतर्गत कारवाईसाठी वापरली जाणार आहेत. 

दरम्यान, पसार असलेले संशयित अभी महाडिकसह अन्य दोघांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यातही साखरे गॅंगवर खासगी सावकारीसह दाखल असलेल्या अन्य गुन्ह्यांची माहिती मिळावी, यासाठी सर्व पोलिस अधीक्षक कार्यालयांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. दरम्यान, सूरज साखरे, ऋषभ भालकर आणि पुष्कराज यादव यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com