अनधिकृत वाळू उपश्यावर कारवाई करावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

कऱ्हाड : तालुक्‍यातील नदीपात्रालगत होत असलेल्या अनधिकृत वाळू उपश्‍यावर महसूल प्रशासनाने कारवाई करावी. तसेच संबंधित कोर्टी गावच्या तलाठ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यातीने तहसील कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन केले. यातून जमा झालेल्या पैशातून रिमांड होम, क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृहातील मुलांना पदाधिकाऱ्यांनी वह्या वाटप केले.

महसूल प्रशासनाने तालुक्‍यातील नदीपात्रालगतच्या शेतीतील मातीमिश्रीत वाळूचे निष्काषण करण्याचे परवाने दिले आहेत. परंतु तसे न करता नदीपात्रालगतच्या वाळूचे जेसीबी, पोकल्यानच्या सहाय्याने उत्खनन करून हजारो ब्रास वाळूची राजरोस चोरी होत आहे. तरी या अनधिकृत वाळू उपशावर महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती.

त्याचबरोबर कोर्टीतील शेतकऱ्याने शेतात आणलेला गाळ हा बेकायदेशीर असून यावर कारवाई न करण्यासाठी तलाठ्याने लाच मागितली होती. संबंधित तलाठ्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी ही केली होती. त्यासाठी संघटनेच्यावतीने आज भिक मांगो आंदोलन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, रोहित पाटील, योगेश झांबरे, अमर कदम, लालासाहेब साळुंखे, शिवाजी पाटील, राजेंद्र पोळ आदी उपस्थित होते. या आंदोलनात जमा झालेल्या पैशातून रिमांड होम आणि क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृहातील मुलांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वह्या वाटप केले.

Web Title: Action should be taken against unauthorized sand disposal