esakal | बोगस डॉक्टराविरोधात कारवाईचा फास आवळणार |Belgaum
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टर

Belgaum : बोगस डॉक्टराविरोधात कारवाईचा फास आवळणार

sakal_logo
By
अमृत वेताळ

हेही वाचा: Mumbai Airport: गर्दीच्या ढिसाळ नियोजनाबाबत व्यक्त केला खेद

बेळगाव : बोगस आणि होमिओपॅथी पदवी असून देखील रुग्णांवर ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टरवर आरोग्य खात्याने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार (ता. ७) गांधीनगर आणि कणबर्गी येथील दोन ठिकाणी कारवाई करून दवाखाने सील करण्यात आले आहेत. आरोग्य खात्याचा या धडक कारवाईमुळे शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावात डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. भविष्यात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: अजित पवार खोटं बोलतात; शालिनी पाटलांचा घणाघात

पदवी होमिओपॅथीची असून देखील लोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळात बीएचएमएस बीएमएस झालेले डॉक्टर दवाखाना असे फलक लावून लोपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे एकप्रकारे रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ आता आरोग्य खात्याने गांभीर्याने घेतला आहे. रुग्णाला झालेल्या आजाराचे योग्य निदान करण्याऐवजी रुग्णांना हायर प्रतिजैविक औषधे दिली जात आहेत. त्यामुळे याचा विपरीत परिणाम रुग्णांवर होत आहे. इतकेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्राशी कोणत्याही प्रकारची पदवी नसलेले देखील आता डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू लागल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे.

हेही वाचा: अजित पवार खोटं बोलतात; शालिनी पाटलांचा घणाघात

एखादा गंभीर स्वरूपाचा आजार झालेला रुग्ण आल्यास त्याला आपल्या मर्जीतील डॉक्टरकडे पाठवले जाते. रुग्णाच्या मागे आर्थिक व्यवहार ठरविला जातो. हे देखील आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे भविष्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासह होमिओपॅथीची पदवी असून लोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्यावर देखील आता कारवाईचा फास आवळला जाणार आहे.

loading image
go to top