मूल्यमापनला गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Action will taken against teachers who absent evaluation 0f ssc exam belgaum

मूल्यमापनला गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई

बेळगाव : दहावी परीक्षेच्या मूल्यमापनाला गैरहजर राहीलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. त्यामुळे गैर हजर राहिलेल्या शिक्षकांची चिंता वाढली आहे. २८ मार्च ते ११ एप्रिल पर्यंत दहावीची परीक्षा पार पडले होते त्यानंतर 23 एप्रिल पासून विविध केंद्रांवर पेपर तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून सध्या पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र यावेळी अनेक केंद्रांवर पेपर तपासणीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी दांडी मारल्याचे दिसून आले होते. त्यामुळे काही विषयांचे पेपर तपासाला अडचण निर्माण झाली होती त्यामुळे पेपर तपासणीच्या कामासाठी हजर व्हा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे काही शिक्षक दोन-तीन दिवसांनी पेपर तपासणीच्या कामासाठी दाखल झाले होते.

शिक्षण खात्याने शनिवारी पत्रक जाहीर करुन मूल्यमापनाच्या कामाला दांडी मारलेल्या शिक्षकांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शिक्षकांवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती गटशिक्षणाधिरी यांना शिक्षण खात्याला द्यावी लागणार आहे. कारवाई करण्यास चालढकल करू नये अशी स्पष्ट सूचना देखील शिक्षण खात्यातर्फे अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

मूल्यमापन करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत याची दखल घ्या असे शिक्षण खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले होते त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.

मूल्यमापनाचे काम पूर्ण होत आले असून 12 मे रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी शिक्षण खात्याकडून सुरू झाली आहे. निकालाची तारीख येत्या एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Action Will Taken Against Teachers Who Absent Evaluation 0f Ssc Exam Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top