अभिनेते शिवरंजन अज्ञातांनी झाडलेल्या गोळीबारात बचाविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actro Shivranjan

अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात उद्योजक आणि चित्रपट अभिनेते शिवरंजन बोळण्णावर मंगळवारी (ता.१२) रात्री आठच्या सुमारास बचाविले.

अभिनेते शिवरंजन अज्ञातांनी झाडलेल्या गोळीबारात बचाविले

बेळगाव - अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात उद्योजक आणि चित्रपट अभिनेते शिवरंजन बोळण्णावर मंगळवारी (ता. १२) रात्री आठच्या सुमारास बचाविले आहेत. हल्लेखोरांनी सलग ३ गोळ्या पिस्तुलीतून झाडल्या. सुदैवाने तिन्ही गोळ्या चुकविण्यात यश आले.

घटनास्थळी व पोलिसांनी याबाबत सांगितले की, बैलहोंगल येथील शिवरंजन बोळण्णावर हे प्रसिध्द उद्योजक व अभिनेते म्हणून परिचीत आहेत. शिवरंजन मंगळवारी रात्री हनुमान मंदिराकडे आले होते. या दरम्यान अज्ञाताने अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यामुळे शिवरंजन हे घाबरून जीव वाचविण्यासाठी धावण्यास सुरु केले. मात्र, या कालावधीतही अज्ञात हल्लेखोरांकडून ३ पिस्तुलीच्या गोळ्या चालविल्याची माहिती आहे. हल्लेखोराचा निशाने चुकले आणि अभिनेते शिवरंजन हल्ल्यात बचाविले.

जिल्ह्यात खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी येथे भेट दिली. अतिरिक्त जिल्हा पोलिस नंदगावी, डीवायएसपी शिवानंद कटगी, पोलिस निरीक्षक यू. एच. नंदगावी यांनी भेट देऊन पाहणी केली.

२४ तास लोटले; धागेदोरे नाही

बैलहोंगलमधील गोळीबारला २४ तास झाले. अद्याप धागेदोर मिळाले नाहीत. मात्र, या हल्ल्यामागे महेश नामक संशयित असल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यासाठी दुचाकीचा वापर केला असून, दुचाकीवरून दोघे आले होते. यामुळे हल्यामध्ये दोघांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यांची माहिती आणि कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.

‘अभिनेते शिवरंजन याच्यावर गोळीबार कोणी केल्याचे अजून स्पष्ट नाही. मात्र, माहिती घेतली जात आहे. मात्र, प्राथमिक पातळीवर अल्पावधीत मिळालेली प्रसिध्दी किंवा आर्थिक देवाण व घेवाणवरून हल्ला घडल्याचे जाणविते. त्यादिशेने तपास सुरु आहे.’

- श्री नंदगावी, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख

Web Title: Actor Shivaranjan Was Rescued By Unknown People Firing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeattackActor