शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर सर्वसामान्यांचा विश्‍वास -  आदित्य ठाकरे

सुनील कोंडुसकर
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

चंदगड - महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेवर गाढ विश्‍वास आहे. तळागाळातील जनतेचे काम करणे हा शिवसैनिकाचा धर्म आहे. याच जोरावर आगामी निवडणुकीत शिवसेना बाजी मारेल असा विश्‍वास युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी अल्पकाळाचा संवाद साधला. 

ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला चंदगड तालुक्‍यापासून सुरवात झाली. पहाटे पासूनच कार्यकर्ते त्यांच्या प्रतिक्षेत थांबले होते. बेळगावहून दुपारी बाराच्या सुमारास ते थेट शिनोळी येथे आले. श्री. खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

"आवाज कोणाचा, शिवसेनेचा !' अशा घोषणांनी परिसर निनादून गेला. ठाकरे यांच्या हस्ते श्री. खांडेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. कार्यालयात अवघ्या काही मिनीटात त्यांनी श्री. खांडेकर यांच्याशी बोलणी केली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्री. खांडेकर यांनी तालुक्‍यातील स्थिती कथन केली. त्यानंतर ते शिनोळी औद्योगिक वसाहतीतील डॉल्फीन अॅण्ड डॉल्फीन कंपनीच्या आरोग्य मेळाव्याचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कंपनीचे अण्णा दुराई यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला पंधरा मिनीटे हजेरी लावून श्री. ठाकरे नेसरीच्या दिशेने रवाना जाले.

या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, जिल्हा प्रमुख विजय देवणे, सुनील शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, अशोक निकम, संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, संज्योती मळवीकर, शांता जाधव, श्‍वेता नाईक, प्रतिक क्षीरसागर, प्रताप पाटील, शिनोळी खुर्दच्या सरपंच नम्रता पाटील, उपसरपंच गुंडू करटे, शिनोळी बुद्रूकचे सरपंच नितीन पाटील, उपंसरपंच बंडू गुडेकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
Web Title: Aditya Thakare comment