शाळांपुढे कोरोना संबंधी 'हा' यक्ष प्रश्न ?

शाळांपुढे कोरोना संबंधी 'हा' यक्ष प्रश्न ?

सातारा : कोरोना व्हायरसचा धसक्‍याने सातारा जिल्ह्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या 50 टक्‍क्‍यांवर घसरली आहे. या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण मोठ्या संख्येने असते परंतु त्याचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. दरम्यान कोरोना व्हायरस आणि त्यासंबंधी नेमकी काय काळजी घ्यावी यासाठी पाचगणीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांची बैठक उद्या (बुधवार, ता.11) दुपारी तीन वाजता तहसलिदारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळल्याने आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शासनाच्यावतीने घाबरु नका, काळजी घ्या घेण्याचे संदेश आरोग्य विभागाच्या माध्यमातून सोशल मिडियाद्वारे, प्रसिद्धी माध्यम तसेच विविध माध्यमातून पाठविण्यात येत आहेत. महाबळेश्‍वर आणि पाचगणी येथे मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येत असतात. त्या पार्श्‍वभुमीवर तेथील हॉटेल व्यावसायिक, टॅक्‍सी संघटना यांना कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभुमीवर कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शक तत्व सांगण्यात आली आहेत. या व्हायरसचा संसर्ग होऊ नये या भितीपोटी थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्य कमी होऊ लागली आहे. 

सद्यस्थितीत महाबळेश्‍वर येथे पर्यटन व्यवसाय व्यवस्थित असल्याचे सांगितले जात आहे. तेथे पर्यटकांची संख्या फारशी कमी झालेली नाही. आज (मंगऴवार) धूलविंदनची सुट्टीची मजा लुटण्यासाठी गटागटाने युवा वर्ग महाबळेश्वरात दाखल हाेऊ लागले आहेत. परंतु पाचगणीत मात्र पर्यटकांची संख्या 50 टक्‍क्‍यांवर आल्याचे सांगितले जात आहे. त्यातच पाचगणी येथील निवासी शाळांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. सद्यस्थितीत पाचगणीमधील निवासी शाळांच्या व्यवस्थापनाची शाळांना सुट्या दिल्या पाहिजे का याबाबत चाचपणी सुरु असल्याचे समजते. 


Video : खास तिच्यासाठी गृह राज्यमंत्री थेट शाळेच्या दारात 

बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक परदेशात आहेत. त्यामुळे शाळांना सुटी दिल्यास आणि विद्यार्थी परदेशी जाऊन सुटीनंतर शाळेत आल्यास त्यांची तपासणी कशा पद्धतीने करायची याची काळजीही शाळांना वाटत आहे.  दरम्यान महाबळेश्‍वरच्या तहसिलदार सुषमा पाटील यांनी पाचगणीच्या सर्व शाळांची पालिकेच्या सभागृहात बुधवारी (ता.11) दुपारी तीन वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत शाळा तसेच महाविद्यालयांना आरोग्य विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार कोरोना आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणावरील सर्व गर्दीच्या कार्यक्रमास प्रतिबंध घालणेबाबतचे मौखिक निर्देश शासनस्तरावरुन प्राप्त झालेले आहेत. कोरोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असलेने संबधीत आयोजकांनी जिल्हयात गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमांचे उदा. यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदांसारखे गर्दीचे कार्यक्रम, शाळा व महाविदयालयातील स्नेहसंमेलने, प्रदर्शने व इतर धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे व सार्वजनिक उत्सव इत्यादी आयोजन केल्यास कोरोना विषाणूचा मोठया प्रमाणावर फैलाव होऊ शकतो तरी जिल्हयातील सर्व विभाग प्रमुखांनी संबंधीत आयोजकांस कोरोना विषाणूच्या आजाराचे गांर्भिय लक्षात आणून देऊन, त्यांना गर्दीच्या ठिकाणावरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन न करणेबाबतचे महत्व पटवून देऊन संबंधीत आयोजकांस कार्यक्रमाचे आयोजन करणेपासून परावृत्त करावे. शासन निर्देशांची तात्काळ काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची जबाबदारी ही सातारा जिल्हयातील सर्व संबंधीत विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे आवाहन एका परिपत्रकान्वये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com