सातारा जिल्ह्यात अकरावीचे प्रवेश 25 जूनपासून
सातारा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन पद्धतीने निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालाची गुणपत्रिका शुक्रवारी (ता. 22) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आज अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी तीन जुलैला जाहीर होणार असून, 16 जुलैला अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
सातारा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन पद्धतीने निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालाची गुणपत्रिका शुक्रवारी (ता. 22) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आज अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी तीन जुलैला जाहीर होणार असून, 16 जुलैला अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्जाचे शुल्क 10 रुपये, तर माहिती पत्रकाचे शुल्क जास्तीतजास्त 40 रुपये घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
असे आहे वेळापत्रक
25 ते 28 जून - प्रवेश अर्ज विक्री व स्वीकृती.
29 जून ते दोन जुलै - प्रवेश अर्जांची छाननी, तपासणी, गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी करणे.
तीन जुलै - गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी (दुपारी तीन वाजता) जाहीर करणे.
चार ते सात जुलै - निवड यादीमधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देणे.
नऊ ते दहा जुलै - प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
11 ते 12 जुलै - दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील तर प्रवेश देणे.
13 ते 14 जुलै - रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.
16 जुलै - कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वीचे वर्ग सुरू करणे.