तंत्रज्ञानातील शब्दांना आपलेसे करावे मराठीने : डॉ. काळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

सोलापूर : वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर अनेक नव्या शब्दांचीही निर्मिती होत आहे. या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार करून ते भाषेत समाविष्ट करणे अधिक जिकरीचे आहे.

सोलापूर : वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर अनेक नव्या शब्दांचीही निर्मिती होत आहे. या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार करून ते भाषेत समाविष्ट करणे अधिक जिकरीचे आहे.

यापूर्वीही अनेक भाषांतून शब्द मराठीत आले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानातून आलेले शब्द आपण आहेत तसे स्वीकारले पाहिजेत असे मत डोंबिवली येथे होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मांडले.
अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यात त्यांनी सकाळ कार्यालयास रविवारी भेट दिली. या वेळी डॉ. काळे म्हणाले, वाचन संस्कृतीचा विकास होणे साहित्य, भाषा विद्यार्थी कसे शिकतात त्यावर अवलंबून आहे.

वाचनसंस्कृतीचा विकास होणार नाही तोपर्यंत साहित्य आस्वादकांपर्यंत पोचणार नाही. अन्यथा साहित्य पुस्तकांच्या कपाटातच बंदिस्त राहील. वाचनाची आवड समाजात निर्माण व्हावी याकरिता कमी किमतीत पुस्तके कशी उपलब्ध होतील याचा विचार व्हावा. प्रकाशकांनी ग्रंथांना सजावट करून महागडे ग्रंथ बनविण्यापेक्षा गरिबांनाही परवडतील असे ग्रंथ दिल्यास मराठी भाषा तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. यासाठी शासनाचे सहकार्य मिळण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: adopt technical words, appeals kale