सोलापूरच्या वकीलांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

सोलापूर : ऍड. राजेश कांबळे खून खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सोलापूर बार असोसिएशने केली आहे. वकील हल्ला विरोधी कायदा करावा त्याचा मसुदा तयार केला असून तो शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ऍड. कांबळे यांचा निर्घृणपणे केलेला खून तसेच वकिलांवरील होत असलेले हल्ले यांचा विचार करुन पाच तज्ज्ञ मंडळींनी कायद्याचा मसुदा तयार केला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मध्यस्तीने मुख्यमंत्री फडणवीस यांना बार असोसिएशनचे शिष्टमंडळ भेटणार आहे. वकिलांवर होत असलेल्या हल्याचा विचार करता त्यांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्याची गरज आहे. याबाबत सरकारने पावले उचलली नाहीत, त्यासाठी समिती गठीत करण्याची गरज आहे. न्यायालयातील परिसर किंवा ऑफीसमध्ये वकिलाला दमदाटी करणे, शिवीगाळ किंवा हल्ला झाला तर त्यास तीन वर्ष सक्तमजुरीची मागणी केली आहे. हा गुन्हा दखलपात्र करावा असे वकीलांचे म्हणणे आहे.

वकिलाचा आपत्कालीन मृत्यू झाला तर अशावेळी त्यास नुकसान भरपाई म्हणून पाच लाखांची मागणी केली आहे. तसेच गुन्हा न्यायालय आवारात घडला आणि वकिलास अटक करावयाची असल्यास बार कौन्सिलची परवानगी शिवाय अटक करु नये. समिती चौकशी नेमून तपासणी करावी, अशीही मागणी केली आहे. यावेळी संतोष पाटील, महेंद्र वड्डेपल्ली, डी. एम. होसमनी यांच्यासह वकिलांची उपस्थिती होती. 

ऍड. चव्हाणांची दुचाकी जप्त 
ऍड. कांबळे खून प्रकरणात आरोपी ऍड. सुरेश चव्हाण याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी बंटी आणि दागिने घेणारा सराफ श्रीनिवास येलदी यांची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणात एका नगरसेवकाचा जबाब नोंदविण्यात आला आहे. हा जबाब तपासाच्या अनुषंगाने महत्वाचा ठरणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advocate delegations meets CM Devendra Fadnavis