...अन् 5 वर्षांनी कुत्रा परतला स्वगृही !

भारत नागणे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पंढरपूर : मालकाशी इमानी आणि तितकाच प्रामाणिकपणे राहणारा प्राणी म्हणून आजही कुत्र्याची आेळख कायम आहे. असाच एक इमानी 'लॅब्रेडोर' जातीचा 'जिमो' नावाचा सहा वर्षे वयाचा कुत्रा तब्बल पाच वर्षांनी पंढरपुरातील आपल्या स्वगृही परतला आहे. इतक्या वर्षांनी कुत्रा अचानक घरी परतल्याने त्याचा मालकही आनंदाने भारावून गेला आहे. जिमो आणि त्याचा मालक डाॅ.मुकुंद कौंडुभैरी यांच्या भेटीने त्यांचा मित्रपरिवार सुखावला आहे.

येथील गोविंदपूरा भागात डाॅ. मुकुंद कौंडूभैरी आपल्या कुटुंबासह  राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांनी अवघ्या एक ते दीड महिन्याचे लॅब्रेडोर जातीच्या कुत्र्याचे पिल्लू पाळण्यासाठी विकत आणले होते. एक वर्षभर त्याचे चांगले पालनपोषण केले. त्याला अनेक चांगल्या सवयी शिकवल्या. वर्षभरानंतर अचानक एक दिवस त्यांचा आवडता जिमो कुत्रा बाहेर फिरायला गेला. तो परत आलाच नाही. त्यानंतर डाॅ.कौंडुभैरी यांनी शहरातील अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला. पाहुणे, मित्रांकडे चौकशी केली. परंतु तो कुठेच आढळून आला नाही. त्याच्या बेपत्ता होण्याने कौंडुभैरी कुटुंब अस्वस्थ झाले होते.  प्राणी वात्सल्य असलेल्या डाॅ.कौंडुभैरी यांनी प्रसिध्दीपत्रकांद्वारे कुत्र्याला शोधून देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले. तरीही कुत्र्याचा शोध लागत नव्हता. 

3 डिसेंबर रोजी सकाळी डाॅ. कौंडूभैरी यांच्या गाडीचा चालक राजू क्षीरसागर यांना अर्बन बॅंकेजवळ काळ्या रंगाचे एक कुत्रे असल्याचे दिसून आले. क्षीरसागर यांना या कुत्र्याविषयी शंका आल्यानंतर त्यांनी डाॅ. कौंडुभैरी यांना फोन करुन बोलावून घेतले. डाॅ. कौडुंभैरी आणि कुत्रा जिमोची नजरानजर होताच. जिमोनी धावत येत डाॅ.कौडुंभैरीच्या अंगावर झेप घेतली. गेल्या पाच वर्षांपासून ताटातूट झालेल्या जिमो आणि त्याच्या मालकाची याची-देही याची डोळा भेट झाली. या भेटीनंतर जिमो आणि डाॅ. कौंडुभैरींची आेळखही पटली. जिमो घरी परतल्यानंतर  डाॅ.मुकुंद कौंडुभैरी कुटुंबिय आनंदित झाले आहेत.

Web Title: After 5 years the dog returned home